Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

लोकगीते - श्रीखंडोबाची पदे

खंडोबाची पदे लोकगीतांची फार मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे, जात्यावरच्या ओव्या, भलरी गीते, लावणी, वासुदेव, गोंधळाची पदे, जागरणाची पदे, असे विविध लोकगीतांचे प्रकार महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळतात. लोकगीतांना कुठलाही छंद अथवा मात्रा लागू पडत नाही तर साहित्यातील व्याकरणही लागू होत नाही. लोकगीते हि कुठल्या कागदावर लिहिली जात नाहीत, ती लिहिली जातात रसिकांच्या हृदयावर. हृदयाच्या अंतःकरणापासून स्फुरते आणि सहज ओठावर येते ते लोकगीताचे जन्मस्थान आणि लोकांच्या कानाला मोहवून लोकांच्या ओठी चपखलपणे बसून हृदयावर राज्य करते ते लोकगीत. श्रीखंडोबाविषयी असलेल्या श्रद्धेतून अशा अनेक नामवंत आणि अज्ञात रचनाकारांनी अनंत रचना केल्या आहेत. अनेक वर्षे उलटूनसुद्धा आजही लोकांच्या ओठावर या रचना सहजपणे येतात. हीच पदे मल्हार स्तुतीच्या जागरण या विधीमध्ये वाघ्या मुरुळी संगीत आणि नृत्यांच्या साथीने सदर करीत असतात. अशा ज्ञात अज्ञात गीतकारांची संग्राह्य पदे "देवा तुझी सोन्याची जेजुरी" www.jejuri.in संकेतस्थळाच्या वाचकांसाठी.
संदर्भ :
एक होता राजा - संपादिका डॉ.सरोजिनी बाबर.
खंडोबाची पदे - संग्राहक वा. दा. गोखले. 
वाघ्या मुरुळीची हस्तलिखिते

अश्विन महिना

अश्विन महिना प्रातःकाळीं नहाती कर्‍हेच्या तिरीं, फुले पुष्पातें ओटया भरी,

भरुनि कर्‍हेचे पाणी कळस चंबू चांदिचा शिरी,

दाट कांसडया सोनेरी मिळुनी सर्वांचा थाट,

चालला वाट धरोनी हारोहारी, एका मागें एक सुंदरी,

सतरावीचा घाट चढता वाट जाती पठारी,

उंच मेरुच्या शिखरी, घालूनि कर्‍हेचे स्नान देवाला बाणु

म्हळसा सुंदरी, उभे भैरव जोगेश्वरी, आश्विन महिना यात्रा भरति

आनंद होतो जाग्रणी चला जेजुरी साजणीला

रात्रन् दिवस माझ्या नयनी बसतो दिसतो

माझ्या मनी चल जेजुरीला साजणी ॥१॥

पहिल्या प्रहरी निघतो छबिना उजवे मानेवरी वाघा गरजतो

दरबारी गर गर गर गर गिरक्या मारितो

नानापरि ढोल सनया नाद किलकारी मधे मुरळ्यांचा थाट

भोंवताली दिव दिवटया हारोहारी एका चढीत एक सुंदरी

उंच पैठणीचा शालू नेसाया काठ पदराला जरी खुप श्रृंगार बनला

परी तीन प्रहर मग जागरण झाले

चौथ्या प्रहरी तोंड धुन चल जेंजुरीला साजणी ॥२॥

विजय दशमीला स्वारी शिलांगण हुकुम प्रधान प्रति कुंचाजीले

डंके वाजती मानकर्‍याचा थाट बरोबर

गोपाळ आरती पालखीत म्हाळसापती ।

गिरीकंदराच्या चार रस्त्याकडून स्वारी पहाडाहून

केवढी मौज दिसती बाणामागे बाण सोडिती ।

एका बाणाचा घा उभयता आंत त्याने भेटती होती

आवाज पहाड गरजती होती

आपटयाची पूजा ब्रह्मदेव सांगती नारदमुनी

चला जेजुरीला साजणी ॥३॥

थेट रमण्यामध्ये स्वारी चमकती उत्तरे समोर जे जे

वाडी मूळ पाठार उजवी घेऊनी

मारुति वेशीमध्ये येशवंत मल्हार बाजूला

भाक होळकर चंदी चंदवडजे राजे अक्कलकोट, भरतपूर, जाकपूर,

शाहु राजे सातारकर, शुष्क रंगाचे हत्ती सजविले,

हौद अंबारीवर लखलख कळस झालर नदर पेटमध्यें

स्वारी थोपली खुली रात्र चांदणी चला जेजुरी साजणी ॥४॥

झोकनोक स्वारी चाक लावा उजवी घेऊनी मारुती रस्त्यानें

स्वारि मिरविती दो रस्त्यावर

सावकार मंडळी दीप दिवटया घेऊन हाती ।

भर ओंजळ भंडार उधळती । अपार पेटल्या दिवटया हारोहारी

दीपमाळ जळती स्वारी चढतां, मौज दिसती

आली किल्ल्यामध्यें स्वारी चौघडे गंगनाम गर्जती

नानापरी वाद्ये वाजति

मुकिदेगिर प्रसन्न बापुचे चित्त त्याच्या चरणी

कडे पठार आमचे धनी रात्रन दिवस माझ्या नयनी,

दिसतो बसतो माझ्या मनीं चल जेजुरीला ॥५॥

महाराज चरचिलें आगीं ।

महाराज चरचिलें आगीं ।

भंडार भूशन पीवळे पीतांबर नेसुनी रेखिली भाळी ॥महाराज॥

उंच मैलागिरी चंदन, शिरी शिरी पेचतुरा, अंगामध्यें जामा ॥महाराज॥

पिवळी आसमान शोभती शाल पिवळी वरुन हातामधे खंडा ॥महाराज॥

झालि आसनावरती स्वार, हे गडी प्रधान बरोबरी पाहिले नयनी ॥महाराज॥१॥

महाराज उतरली स्वारी । किल्ल्याच्या तळवटी, झाली शहरामध्यें दाटी ।

देव पाहा जाती । महाराज । जाती होळकराच्या भेटी ॥

हातीवर निशान, वाजती घाटी ॥ छडी भालदार, संगे वोज वोटाटे उडती,

भले वान जेठी । महाराज ॥ कलावा घेती,

जाती कचेरीच्या कांठी रमस्थळ जागा ।महाराज ॥

जागा कर्‍हातीरीं, आमवशा दिवस सोमवारीं, पाहिलें नयनी ॥महाराज॥२॥

महाराज उडते पाणी ॥ स्नान कर्‍हाबाई निरमळ बाई ॥

चकरेमध्यें नाहाती ॥ महाराज ॥ जळो परवत पापांचें,

दर्शन होते पायांचें मनुश मिळालें ॥ महाराज ॥

देशोदेशींचें भवरगांव लहान मोठयाचे, घेणें देणें,

एका प्रहराचें, महाराज ॥ उठा वेळ झाला जलदी जायाचें जैजैकार होतो,

आम्हांवर उधळे भांडार,

आणि पुढे वाद्याचा गजर पाहिलें नयनी ॥महाराज॥३॥

महाराज परतली स्वारी, जेजुरी नाम नगरी,

काळोखी रात्र अंधारी, दीप दिवटयाचा पाजळे हाद्वारी,

आणिक दीपमाळा हारोहारी, पुढें ललकारी ॥

महाराज, पोचली किल्ल्यावर स्वारी,

घेऊन देऊन उजवी बसले म्हाद्वारी ॥महाराज॥

आनीक लोक शीवबंदी हाजेरी घेती ॥महाराज॥

धनीक ऊंद सरकार,

जोंधळे बतीस भंडार पाहिलें नयनीं ॥महाराज॥४॥

 

नाग पूजाया जाते म्हाळसा

नागपूजाया जाते म्हाळसा नगर नारींचा थाट

बरोबर नगर नारींचा थाट जी

देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचे ताट जी

अलंकार पिवळे अंगावर शालू पीतांबर पिवळे

आंत डोईस मुदराखडी सेस फुलें चंद्रकोर मोर आवळा

जी साचवगी साजणे मिळाल्या ग आणिक वारा सोळा

जी जसी रे म्हाळसा देवांगनामदी जोत चमकली चपला जी

जसा आकाशीं चद्र चांदण्या ग नक्षत्राचा मेळा

मिळाल्या ग नक्षत्र मेळा चौघीचे चौघडे पांचवी ग मुज्रावीण एक बाळा

जी एकच गरदी झाली मिळे ना ग वर जाण्या वाट

जी देवांगना गजघाट हातामंदी तबकें सोन्याचें ताट जी

नागपूजाया चाल. दोर धरुन गुण गाती नाचती करकर लवती आंकडा

नाचती नाचवती कोंबडा घालिती पिंगा पकवा झगडा जी

शिरींचा पल्लव टाकून खांद्यावर भुजाबावटे उघडे

खांद्यावर कुणी इकडून तिकडे उभयता भार घालिती झगडा जी

चक्रावाणी गरगर फिरती एक हाताच्या फुगडया खेळती

चंद्रहार लखलखती गळ्यामधी करंडफुल कानीं बुगडया जी

पायीं पैंजण तोरडें हातामधीं कंकण पाटल्या गोट जी

देवांगना गजघाट हातामधीं कंकण पाटल्या गोट नागपूजाया

पहाडपर जोत खडे मलुखान

जोत खडे मलुखान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥

लगे दख्खनका मैदान, पहाडपर जोत खडे मलुखान ॥चाल॥

नीले जर्दपर कडक सवारी, भडक पीले निशाण ॥

मनी मल्लेकु धडक लगाये, घेर लिया आस्मान ॥पहाडपर॥

राव होळकरने किल्ला बनाया, महल जडित हिरखाण ॥

नऊ लक्ष पायरी बनाया, कळस झडके दिनमान ॥पहाडपर॥

किल्ले अंदरसे निकला भुंगा मोगल कहे मलुखान ॥

कहे कुत्तेकु हाड ना बोले, चारि कोट सन्मान ॥पहाडपर॥

कहे मुकुंद गिर चाकर बोले रखो चरणपर ध्यान ॥

बापु वाघास सन्मुख गावे, सिद्ध करी अनुमान ॥पहाडपर॥

मुख दावुन बानु ग गेली

मुख दावुन बानु ग गेली स्वारी देवाची ग वेडी झाली ।जी।

एकदा मधानीच्या आमलांत देव मल्हारी निदरागत ।

बानु नार आली स्वशनारत हिने उशाला मांडी ग दिली ।

स्वारी देवाची ग वेडी झाली । जी । मिळवणी ॥

ह्याग बानु नारीचे आंग जसे चमके ऐनेच भिंग ।

देव मल्हारी झाले दंग गोष्ट देवाच्या मनीं ग ठसली ।

स्वारी देवाची ग वेडी झाली मुख दावुन बानु ग गेली ।

स्वारी देवाची ग वेडी झाली मुख दावुन ॥२॥

मल्हार मल्हार वाचे घोका

मल्हार मल्हार वाचे घोका, पुढें पाऊल टाका ।

मल्हार मल्हार वाचे धोका ॥चाल॥

मल्हार धोकीता । चुकेल चौर्‍याऐशी यमाची फाशी ।

मल्हार मार्तंड तीर्थ काशी, ही घडेल कैशी ।

येऊन सार्थक करा जन्माशी जा भेटा

त्याशी एवढा सांगतो मंत्र तुम्ही ऐका ।

पुढे पाऊल टाका ॥ मल्हार ॥१॥

मल्हार माझा गुणाचा मोठा हार घालूं कंठा

याचें नांव घेतां सुचतील वाटा

काय पुजुनी गोटा शोधा मनीं अंतरीं ओळखा ।

पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥२॥

मल्हार शिव शंकर भोळा भक्तिचा डोळा याला ओळखील,

तो एक विरळा त्याला लागल जिव्हाळा मोठा कनवाळु

मनाचा कवळा फार करील सोहोळा शोधा मनीं अंतरी ओळखा

पुढें पाऊल टाका ॥मल्हार॥३॥

 

Bookmark and Share